मुख्यमंत्री साहेब लवकर करा अभ्यास गोरगरीब जनतेला मिळत नाही गॅस*
बीड प्रतिनिधी:- कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण जग थांबल्यासारखं झालं होतं. शहरांमध्ये काम करणारे लाखो कामगार अचानक बेरोजगार झाले. वाहतूक बंद झाली, कारखाने बंद झाले आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांसमोर मोठं संकट उभं राहिलं. त्या वेळी अनेकांनी हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करून आपापल्या गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्या कठीण परिस्थितीत प्रत्येकाला आपल्या गावाची आठवण झाली. गावात किमान घर आहे, माणसं आहेत, थोडं अन्न मिळू शकतं, ही भावना लोकांना आधार देणारी ठरली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात गावाचं खरं महत्त्व अनेकांना नव्याने समजलं याचप्रमाणे युद्धाच्या काळातही लोकांना जगण्याच्या मूलभूत गरजांची जाणीव होते. आधुनिक तंत्रज्ञान, मोठी शहरे, मोठमोठे उद्योग या सगळ्यांच्या पुढे शेवटी माणसाला अन्नाचीच गरज असते अन्न तयार करण्यासाठी साधी चुल आणि धान्य यांचं महत्त्व तेव्हा स्पष्टपणे जाणवतं. युद्धकाळात अनेक ठिकाणी गॅस, वीज किंवा इतर सुविधा बंद पडतात.
अशा वेळी पारंपरिक चुलीवर बनणारं अन्नच लोकांना जगवू शकतं या दोन्ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतात आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्या मुळांपासून दूर जाऊ शकत नाही. गाव, शेती, अन्न आणि चुल या गोष्टी आपल्या आयुष्याचा आधार आहेत. संकटाच्या काळात ह्याच गोष्टी माणसाला आधार देतात त्यामुळे गावाशी आणि आपल्या पारंपरिक जीवनशैलीशी नातं जपणं खूप महत्त्वाचं आहे कारण युद्ध अमेरिका आणि इराण मध्ये चालू आहे परंतु याचा फटका भारत देशाबरोबर अनेक देशांना बसत आहे आणि या सर्व मध्ये आपला महाराष्ट्र बेजार आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेब या सर्व अफवा आहे असं म्हणण्यापेक्षा आपण याच्यावर लवकरात लवकर अभ्यास करणे गरजेचे आहे कारण अख्खा महाराष्ट्र गॅस बुक होत नाही व मिळत नाही म्हणून रांगेमध्ये उभा आहे असे मत सामाजिक कार्यकर्ता किरण डावकर यांनी व्यक्त केल आहे







