आर्थिक फसवणूक कायद्याची अंमलबजावणी करून गुंतवणूकदाराची ठेवी युद्ध पातळीवर परत करावी :- अनिल बोर्डे

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे पुन्हा ग्राहक पंचायत यांची मागणी. 

गेवराई ( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये गुंतवणूकदारानी छत्रपती मल्टीस्टेट, ज्ञानराधा मल्टीस्टेट, श्री मंगलनाथ मल्टिपल निधीमध्ये आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. वरील संस्थेकडून सर्वसामान्य गुंतवणूकदाराची वारंवार फसवणूक करण्यात होतं आहे असे निदर्शनास आले आहे.

सदरील संस्थेस शासन मान्यता असल्यामुळे ठेविदार गुंतवणूक करीत होते तरी सदरील संस्थेचे पदाधिकारी स्वतःच्या मालमत्ते बिल्हेवाट लावून ग्राहकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात ही बाब गंभीर आहे. याबाबत ठेवीदाराचे पैसे मिळण्यासाठी आर्थिक फसवणूक करण्याच्या ग्राहक हिताच्या कायद्याची अंमलबजावणी संस्थेच्या पदाधिकारी यांचे मालमत्तेची विल्हेवाट लावून युद्ध पातळीवर करून गुंतवणूकदाराचे रक्कम शासन गतिमान करून तात्काळ देण्यात यावी.

गुंतवणूकदार अनेक समस्यांना सामना करीत आहेत .त्यापैकी कामगार, सेवानिवृत्त ,व्यापारी, दिव्यांग, पत्रकार ,शेतकरी ग्राहक आदी असून त्यांना अद्याप पर्यंत कसल्या प्रकारची रक्कम प्राप्त झाली नाही. पैसे मिळत नसल्यामुळे जीवन जगणे कठीण होत आहे ही बाब गंभीर आहे.

याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्ध पातळीवर कारवाई करून ठेवीदाराची रक्कम परत करण्याचे आदेश निर्देशित करण्यात यावेत अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केलेली आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon