महानिर्मितीच्या छत्तीसगड राज्यातील गारे पालमा सेक्टर -2 कोळसा खाणीतून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वेरॅकचे आगमन झाले.

📍नागपूर

महानिर्मितीच्या छत्तीसगड राज्यातील गारे पालमा सेक्टर -2 कोळसा खाणीतून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वेरॅकचे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी रेल्वेरॅकला हिरवी झेंडी दाखवून कोळसा हाताळणी प्रकल्पाची पाहणी केली.

 

राज्यातील ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उच्च दर्जाच्या कोळसा खाणीमुळे कोळशाचे अवलंबित्व कमी होणार आहे. तसेच पर्यावरणाच्या संवर्धनासोबत विजेचे दर कमी होऊन भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

 

या कोळसा खाणीमधून कोराडी, चंद्रपूर आणि परळी येथे दीर्घकालीन पुरवठा होणार आहे. महाऊर्जाला उपलब्ध झालेल्या या खाणीमुळे कोळशाच्या गुणवत्तेवर नियंत्रण राहणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणारा असून भविष्यातील वीज तुटवड्याचा धोका कमी होणार आहे. तसेच दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मितीचे अध्यक्ष राधाकृष्णन बी, संचालक अभय हरणे, कार्यकारी संचालक नितीन वाघ, गारे पालमा कोळसा खाणीचे मुख्य अभियंता शैलेश पडोळे, कोराडी औष्णिक प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुदीप राणे, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, गिरीश कुमार, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक दीपककुमार गुप्ता, विनायक गर्गा, आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon