राज्य स्तरीय ब्राह्मण महा अधिवेशनास जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाने हजर राहावे :- अनिल बोर्डे

राज्य स्तरीय ब्राह्मण महा अधिवेशनास जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाने हजर राहावे :- अनिल बोर्डे

गेवराई ( प्रतिनिधी ) सर्व ब्राह्मण समाजाचे अधिवेशन 1 फेब्रुवारी 2026 रोजी 9 ते 7 या वेळेत मंथन हॉल, बीड बायपास ,येथे एमआयटी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे ब्राह्मण अधिवेशन आयोजित केले आहे. अशी माहिती स्वागत अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी दिली आहे.


     या बैठकीत विजय काजे, संदेश देशपांडे, संतोष जोशी, विवेक जोशी, काशिनाथ चांदजकर, महेश कुलकर्णी, रवींद्र पंडित, धनंजय नारळे, संतोष कुलकर्णी, जितेंद्र तरटे, प्रवीण खणाळे, रेणुका दास कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.

 या अधिवेशनास उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

तरी समाजातील सर्व ब्राह्मण समाजाने राज्यस्तरीय अधिवेशनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन स्वागत अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी केले आहे.

तरी ब्राह्मण अधिवेशनास बीड जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण समाजाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय पेशवा संघटना बीड यांच्यावतीने अखिल भारतीय पेशवा संघटना गेवराई तालुकाप्रमुख अनिल बोर्डे यांनी केले आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon