Realme ने त्यांच्या नवीन 14 Pro Series 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केले आहेत. या सीरिजमध्ये दोन मॉडेल्स, Realme 14 Pro 5G आणि Realme 14 Pro Plus 5G, ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. या दोन्ही फोनमध्ये अनेक आकर्षक फीचर्स आहेत, जे तुमच्या स्मार्टफोन अनुभवाला एक नवा आयाम देऊ शकतात.
Realme 14 Pro 5G चा स्पेसिफिकेशन्स
Realme 14 Pro 5G मध्ये 6.77 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स पीक ब्राइटनेस देतो. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7300 प्रोसेसर आहे, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी परफेक्ट आहे. यामध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
Realme 14 Pro Plus 5G चा स्पेसिफिकेशन्स
Realme 14 Pro Plus 5G मध्ये 6.83 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 1.5K रिझोल्यूशन देतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7S Gen 3 प्रोसेसर आहे, जो जबरदस्त परफॉर्मन्स देतो. कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स 896 कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. याच्या फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. बॅटरी 6000mAh आहे, जी 80W सुपरवोक चार्जिंगला सपोर्ट करते.
विशेष वैशिष्ट्ये
Realme 14 Pro Plus 5G हा फोन विशेषत: रंग बदलण्याच्या फीचरसाठी ओळखला जात आहे. हा फोन 16 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानात रंग बदलतो. याचा “कोल्ड सेन्सिटिव्ह कलर चेंजिंग डिझाइन” एकदम अनोखा आहे, जो याला बाजारात एक वेगळा आकर्षण देतो. याचसोबत, प्रो प्लस व्हेरियंटमध्ये ट्रिपल फ्लॅश सिस्टिम आहे, ज्यामुळे फोटो आणि व्हिडीओसाठी चांगला अनुभव मिळतो.
किंमत
Realme 14 Pro Plus 5G च्या 8GB/128GB व्हेरियंटची किंमत 29,999 रुपये आहे, तर 8GB/256GB व्हेरियंटची किंमत 31,999 रुपये आणि 12GB/256GB व्हेरियंटची किंमत 34,999 रुपये आहे. या फोनवर बँक कार्ड वापरल्यास 4000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. याचप्रमाणे, Realme 14 Pro 5G च्या 8GB/128GB व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB/256GB व्हेरियंटची किंमत 26,999 रुपये आहे. या फोनवरही 2000 रुपयांची सूट मिळणार आहे.
विक्री कधी सुरू होईल?
Realme 14 Pro आणि Realme 14 Pro Plus 5G स्मार्टफोन्सची विक्री 23 जानेवारी 2025 पासून Realme.com आणि फ्लिपकार्टवर सुरू होईल.