Post Views: 1
बीड: फायनान्स कंपनीत काम करताना गाड्या उचलण्याचे कौशल्य शिकून त्याचा वापर चोरीसाठी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बीड शहर पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा उमेश अंतरकर (वय २५, रा. पाथर्डी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ८ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपी चोरीच्या गाड्या पाथर्डी भागात नेऊन, “हप्ते थकल्यामुळे बँकेने या गाड्या जप्त केल्या आहेत,” असे खोटे सांगून नागरिकांना विकत असे. यामुळे नागरिकांचे पैसे आणि गाडी दोन्ही गेले आहे. बीड शहर आणि शिवाजीनगर भागातील गुन्हे या कारवाईमुळे उघड झाले आहेत. पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही कामगिरी केली. कागदपत्रांशिवाय वाहने खरेदी करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







