दि. 07/09/2026 रोजी मा. वेंकटराम साहेब सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नेकनूर पोलीस स्टेशनच्या पथकाने नेकनूर येथील डी.एड. कॉलेजसमोरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.
सदर शेडमध्ये गायी, बैल व वासरे अशी एकूण 36 गोवंश जातीची जनावरे अत्यंत दाटीवाटीने डांबून ठेवलेली आढळून आली. जनावरांच्या चारा-पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचे दिसून आले. तसेच शेडजवळील आयशर क्र. MH-17-AG-5439 हे वाहन गोवंश जनावरांच्या वाहतुकीसाठी आणण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तेही जप्त करण्यात आले.
कारवाईत 36 गोवंश जनावरे व आयशर वाहन असा एकूण 30,54,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या जनावरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या सुरक्षित संगोपनासाठी त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले आहे.
याप्रकरणी बशीर ऊर्फ बशू कुरेशी, रा. नेकनूर याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, मधील लागू तरतुदींनुसार नेकनूर पोलीस स्टेशन येथे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावंत सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, श्री वेंकटराम सर उपविभागीय पोलीस अधिकारी केज यांच्या मार्गदर्शनाखाली वं नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांचे नेतृत्वातं पोउनि शंकर गलधर, सचिन धायगुडे, पोह रतन निगुळे, पोअं रामहरी जवरे, आश्रुबा मुरकुटे, विशाल जगताप, शशिकांत ढाकणे यांनी पार पाडली आहे.






