बार्शी नाका परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

बार्शी नाका परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यांचा धुमाकूळ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना भीती वाटत आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत.

 

या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon