राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर 2025 निमित्त जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात यावा:- अनिल बोर्डे

गेवराई( प्रतिनिधी) दिनांक 22 /12/ 25 रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र बीड जिल्हा उपाध्यक्ष यांनी गेवराई तालुक्याच्या वतीने मा. तहसीलदार संदीप जी खोमणे यांना निवेदन देण्यात आले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने शासन परिपत्रकाप्रमाणे” राष्ट्रीय ग्राहक दिन” 24 डिसेंबर 2025 निमित्य विविध उपक्रम राबविण्यात यावेत. अशी मागणी करण्यात आली. 

     उद्देश;- ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांना त्याच्या हक्का बद्दल आणि जबाबदाऱ्याबद्दल जागरूक करणे. बाजारात होणाऱ्या फसवणुकीबद्दल आणि भेसळी बद्दल ग्राहकांना माहिती देणे.

ग्राहक मंचाच्या माध्यमातून तक्रार निवारण प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणे. ग्राहकांना ” ग्राहक पंचायत” च्या कार्यात सहभागी प्रोत्साहित करणे.

सुचवलेले उपक्रम: शाळा/ कॉलेज स्तरावर ग्राहक हक्क व जबाबदारी आधारित प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा घेणे. स्थानिक वृत्तपत्रे, सोशल मीडिया आणि जाहीर सभातून जनजागृती करणे.

ग्राहक हक्क आधारित माहितीपत्रके व पोस्टर्स तयार करून वाटणे. ग्राहक पंचायत प्रतिनिधी द्वारे मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे. याबाबत मा. तहसीलदार मा.संदीप जी खोमणे यांना निवेदन देण्यात आले व चर्चा झाली.

तसेच याबाबत श्री गजानन मोरे साहेब पुरवठा नायब तहसीलदार यांच्याशी कार्यक्रमाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली .याप्रसंगी गेवराई ग्राहक पंचायत तालुकाप्रमुख प्रा. भानुदास फलके, मोहनराव राजहंस, संतोष कापसे आदी हजर होते.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon