तहसील कार्यालय येथे ग्राहक दिन उत्साहात साजरा.

गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तहसील कार्यालय येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र व तहसील कार्यालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 डिसेंबर बुधवार रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन आनंदाने, उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विवेकानंद प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

माननीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या संघटकाची आष्टाध्यायी पुस्तकाचे प्रकाशन( विमोचन) सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी गेवराई ग्राहक पंचायत कार्याचा आढावा उपस्थिता समोर मांडण्यात आला. ग्राहकाने मोठ्या प्रमाणात संघटन करून आपल्या सेवा उपलब्ध करून घेणे काळाची गरज आहे. त्यासाठी ग्राहक पंचायत कार्यात सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे असे सांगितले.

तसेच प्राचार्य डॉ. विजयकुमार बांदल यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 बद्दल सविस्तर माहिती दिली. ग्राहक संरक्षण कायद्याचा जास्तीत जास्त ग्राहकाने लाभ घेणे गरजेचे आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर जोशी व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार पुरवठा श्री गजानन मोरे साहेब यांनी केले.

या कार्यक्रमास ग्राहक पंचायत पदाधिकारी बीके तावस्कर, विश्वास चपळगावकर, वल्लभ तौर, योगेश कापसे, पांगरे तात्या आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Beed Live 24  के बारे में
For Feedback - softisky@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon