आबा व दादा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या पाठीशी. ज्येष्ठ नागरिकाच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविणार. बदामराव पंडित व बाळराजे पवार

गेवराई( प्रतिनिधी )

 गेवराई शहरातील नगर परिषदेतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी सर्वप्रथम श्री जगदंबा जेष्ठ नागरिक सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष अनिल बोर्डे यांनी संस्थेच्या कार्याची व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांसमोर सादर करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक या संस्थेच्या वतीने पुरस्कार प्राप्त, गुणवंत विद्यार्थी सत्कार, विविध वाढदिवस, अधिकाऱ्या चे सत्कार, ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने ग्राहक जागृती करणे व विविध समस्या सोडविण्यात ग्राहक पंचायत यांना यश प्राप्त झाले आहे अशी माहिती अनिल बोर्डे यांनी समस्याचे निवेदन नगरपरिषद यांना दिले आहे उपस्थितता समोर दिली. 

   त्यानंतर बदामरावजी पंडित यांनी जेष्ठ नागरिकांच्या स्थानिक समस्या व शासन स्तरावरील समस्या सोडविण्यात येतील असे प्रत्यक्ष सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील.

 त्यानंतर बाळराजे पवार यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले तसेच श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष अनिल बोर्डे यांनी सेवा निवृत्तीनंतर केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिक हे आमचे मार्गदर्शक असून त्यांना विविध सेवा गेवराई शहरात उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रत्यक्ष सांगण्यात आले . यापुढे आम्ही तुम्हाला आमच्याकडे येण्यासाठी आवश्यकता पडू देणार नाही तुमच्याकडे येऊन समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंदने सर व आभार प्रदर्शनाचे काम श्री हजारे सर यांनी केले. 

 

  याप्रसंगी रोहित पंडित, शिनूभाऊ बेदरे, प्राचार्य डॉक्टर विजय कुमार बांदल दामोदर पानखडे व संस्थेचे विजयकुमार बोर्डे, गणेश रामदासी, बाळासाहेब जोशी, अॅड वहिद विश्वास चपळगावकर अशोक देऊळगावकर , गिरी आधी हजर होते .

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon