खान कॉम्प्लेक्सचा उघड बेकायदेशीर कारभार थांबवला नाही तर २५ /०१/२०२६ पासून जिलाधिकाऱ्यांच्या दारातच आमरण उपोषण — शेख शाकेर यांचा थेट इशारा!

माजलगाव दि.१८ (प्रतिनिधी)

माजलगाव नगरपरिषद प्रशासन बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देत आहे का? असा सरळ प्रश्न उपस्थित करत शेख शाकेर यांनी खान कॉम्प्लेक्सवर तात्काळ कारवाई न झाल्यास २५ जानेवारी पासून जिल्हा धिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा तीव्र इशारा दिला आहे.

 

सोळंके महाविद्यालयासमोरील खान कॉम्प्लेक्समधील अनधिकृत गाळे, पार्किंग जागेवरील कब्जा, समोरील बेकायदेशीर जिने — हे सर्व प्रकार नगरपरिषदेच्या नाकाखाली व त्यांच्या मूक आशिर्वादानेच सुरु आहेत, असा गंभीर आरोप शाकेर यांनी केला.

 

🚨 नगरपरिषदेला दिलेली सर्वात मोठी लाज — मंजूर नकाशा फाट्यावर!

नकाश्यात दाखवलेली पार्किंग जागा व्यापारी गाळ्यांमध्ये बदलून

नगरपरिषदेच्या परवान्याचं खुलेआम बलात्कार झालं आहे.

वाहतूक कोंडी, अपघात, नागरिकांचा त्रास—

हे सर्व पाहूनही प्रशासन गप्प!

 

🔥 नियमभंगांची लांबलचक यादी — तरीही कारवाई शून्य!

६ मीटर साईड मार्जिन गायब

दोन्ही बाजू चे जुने बांधकाम पडण्यात आले नाहीत फायर सेफ्टी नाही

दिव्यांगांसाठी व्यवस्थेचा शून्य विचार

प्रवेश-निकासीचे नियम धाब्यावर

हॉटेल, मॉल, होलसेल दुकाने—धोक्याच्या छायेत

पार्किंगचा संपूर्ण नाश करून उभे केलेले गाळे

 

“हे कॉम्प्लेक्स म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणारा बॉम्ब आहे,” असा तीव्र आरोप शाकेर यांनी केला.

⚠️ नगरपरिषद प्रशासनाचा संशयास्पद मौन

जवळजवळ वर्षभरापासून तक्रारी असूनही

मुख्याधिकाऱ्यांनी एकदा स्थळ पाहणी करून ही 

कोणती ,कारवाई! नाही फक्त नोटीस देऊन प्रशासन मोकळे 

“ही निष्क्रियता नाही—ही उघडी भ्रष्ट साथ आहे, संरक्षण आहे!” असे शाकेर यांनी जाहीरपणे म्हटले.

⛔ २५ जानेवारी पासून थेट संघर्ष — उपोषणात काही घडले तर जबाबदार जिल्हाधिकारी!

 

“मी २५/०१/२०२६रोजी सकाळी १२ वाजता जिल्हा धिकाऱ्यांच्या दारात आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यावेळी माझ्यावर किंवा माझ्या कार्यकर्त्यांवर काही अनुचित घडल्यास त्याला थेट जिल्हाधिकारीच जबाबदार असतील, याची नोंद ठेवा.”

शाकेर यांची मागणी स्पष्ट आणि कडक :

पार्किंग जागेत उभारलेले सर्व बेकायदेशीर गाळे तत्काळ पाडा

कॉम्प्लेक्ससमोरील जिने हटवा

संपूर्ण बांधकामाची जायमोक्याची तपासणी करा

नियम मोडणाऱ्यावर कठोर गुन्हे नोंदवा

माजलगावच्या मध्यभागी असलेला हा बेकायदेशीर कारभार थांबवण्यासाठी आता जनतेचा रोष, प्रशासनाची नापीक भूमिका आणि शेख शाकेर यांचे निर्णायक उपोषण — या तिन्हींचा स्फोटक संगम कोणत्या दिशेने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com

उमेश आसाराम गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी श.प.‌ यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढत वारकऱ्यांना पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून दिली.

Read More »
WhatsApp Icon Telegram Icon