गेवराई ( प्रतिनिधी) ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व संघटनात्मक, प्रगतीसाठी रविवारीज 1 फेब्रुवारी 20 26 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत मंथन हॉल, बीड बायपास, एमआयटी कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे भव्य ब्राह्मण महाअधिवेशनचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिवेशनाची सुरुवात ध्वजपूजन व दीपप्रज्वलनाने होणार असून यावेळी B B I N उद्योजक प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात उद्योजक विवेक देशपांडे उदघाटनपर मार्गदर्शन करण्यात येणार असून सत्राचे अध्यक्ष म्हणून बाजीराव धर्माधिकारी लाभणार आहेत.
यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचा पहिला नागरी सत्कार करण्यात येणार असून त्या महिला आयोगाचे कायदे व महिलांसाठी असलेले संरक्षण यावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज (काळाराम मंदिर नाशिक) ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे , उद्योजक शिरीष बोराळकर, परभणी अधिवेशनाध्यक्ष बंडू नाना सराफ, समाज नेते निखिल लातूरकर (नांदेड) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे . दुपारच्या स्नेह भोजनानंतर ब्राह्मण समाजातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकाचा समाजातर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात अधिवेशनध्यक्ष रमेश देहेडकर( जालना) यांच्या अध्यक्षतेखाली संघटन बळकटीकरण, अमृत योजना, ज्येष्ठ , नागरिकांच्या समस्या, कला , शिक्षण, आयटी, आयुर्वेद, रोजगार व जमीन विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी अॅड भानुदास शौचे , विजय जोशी, अनिकेत सराफ, पप्पू भाई कुलकर्णी, डॉ. विजय महाजन, सौ. श्रुती कुलकर्णी , श्रीराम कुलकर्णी आदि मान्यवर विचार मांडणार आहेत. समारोप सत्रात आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीर दास महाराज यांचे मार्गदर्शन होणार असून दुपारी 4 ते 6 या वेळेत विविध जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते व संस्था व उद्योजकाचा सन्मान तसेच समाजाचे ठराव मंजूर केले जाणार आहेत.
या अधिवेशनात मोफत वधु- वर नोंदणी, ब्राह्मण उद्योजकाची मोफत नोंदणी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, पदवीधर मतदार नोंदणी तसेच रोजगार इच्छुकाची नोंदणी करण्यात येणार आहे.
या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषद ला विजय काजे, संतोष जोशी, काशिनाथ चांदजकर, खांडेकर, महेश कुलकर्णी, लक्ष्मीकांत राजूरकर, प्रवीण खनाळे, सुप्रिया जोशी, जया काळे आदी उपस्थित होते. अशी माहिती स्वागताध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी दिली.
तरी महाधिवेशनास बीड जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय पेशवा संघटना गेवराई तालुका प्रमुख अनिल बोर्डे , अॅड रवींद्र जोशी, अशोक देऊळगावकर, विश्वास चपळगावकर, बाळासाहेब पाठक आदीनी केले आहे.





