जन आरोग्य, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा:- अनिल बोर्डे

गेवराई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जोतीराव फुले एकत्रितपणे राबविण्यात येत असून या अंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांच्या मर्यादित उपचार मिळणार आहेत. राज्यातील सर्व नागरिकांनी आयुष्यमान कार्ड तयार करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी केले आहे. 

         पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना ,पांढरे रेशन कार्डधारक कुटुंब तसेच सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी- कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेत समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. लाभार्थ्याचे आयुष्यमान कार्ड राज्यातील आशा कर्मचारी, आपले सेवा केंद्रातील कर्मचारी यांच्यामार्फत तयार केले जात आहे. 

          लाभार्थी आयुष्यमान ॲप किंवा https:/beneficiary.nha.gov in/ या

संकेतस्थळावरील बेनिफिशरी पर्याय द्वारे आपले कार्ड तयार करू शकतात. कार्ड तयार निर्मितीसाठी अद्यायावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारची जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे, असे अनिल बोर्डे नमूद केले आहे.    

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon