जिल्ह्यात रमजान महिन्यात विद्युत पुरवठा खंडित करू नका:- अनिल बोर्डे

गेवराई ( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात रमजानचा पवित्र महिना सुरू होणार असून या महिन्यात वीज पुरवठा खंडित करू नये अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र मार्गदर्शन केंद्रप्रमुख अनिल बोर्डे यांनी मा. जिल्हाधिकारी बीड व गेवराई महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता मा. श्याम मोरे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

     बुधवार रोजी दिनांक 18/2/2026 पासून रमजान पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ( उपवास) ठेवतात. पहाटे सहेरी व सायंकाळी रोजा इफ्तार करतात आणि रात्री दीड ते दोन तास मज्जिद मध्ये तराविची विशेष नमाज अदा करतात. अशाप्रकारे या महिन्यात अल्लाची इबादत ( उपासना) करतात. त्यामुळे रमजान महिन्यात विजेची अत्यंत आवश्यकता असते. या महिन्यात रात्री किंवा दिवसा वीजपुरवठा खंडित झाल्यास मुस्लिम बांधवाची गैरसोय होते. बीड जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे जनतेची गैरसोय व त्रास निर्माण होत आहे. विशेष म्हणजे रमजान महिन्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता घेऊन योग्य नियोजन करावे. अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अनिल बोर्डे व गेवराई तालुका तालुकाप्रमुख प्रा.भानुदास फलके, अंकुश दाभाडे, प्रमोद कदम, लक्ष्मणराव घोडके आदी च्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी महावितरण चे अशोक वाघमोडे, शेख आझर आदी उपस्थित होते.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com

उमेश आसाराम गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी श.प.‌ यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढत वारकऱ्यांना पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून दिली.

Read More »
WhatsApp Icon Telegram Icon