जिल्ह्यातील रक्कम भरणा करणाऱ्या शेतकरी ग्राहकांना सौर ऊर्जा तात्काळ उपलब्ध करून द्या :- अनिल बोर्डे

गेवराई ( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकाना मागेल त्याला सौर ऊर्जा योजनेचा लाभ मिळावा यासाठी ग्राहक पंचायतने महाराष्ट्र यांनी यापूर्वी वारंवार शासनाकडे मागणी केलेली आहे .त्यां संबंधिचा लाभ बीड जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी ग्राहकांना झालेला आहे. उर्वरित जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांनी सौर ऊर्जा योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकरी ग्राहकांनी एक ते दीड वर्ष पूर्वी महावितरण कंपनी कडे रकमेचा रकमेचा भरणा केलेला आहे. परंतु अद्याप पर्यंत कंपनीकडून सौर ऊर्जा योजनेचा लाभ मिळत नाही.

त्यामुळे शेतकरी ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी रक्कम भरणाऱ्या सर्व शेतकरी ग्राहकांना सौर ऊर्जा योजना लाभ मिळण्यासाठी मा. श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, मा. मुख्य अभियंता महावितरण लातूर, मा. जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे मागणी केली आहे. 

बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी ग्राहक शेतीवर अवलंबून असून इतर काम धंदे नसल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आहे. या भागात मागास म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. तसेच मागास भाग असल्यामुळे उद्योग धंदे देखील नाहीत.

शेती शिवाय पर्याय नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रक्रमाने सौर ऊर्जा लाभ मिळणे आवश्यक आहे. या भागात आर्थिक ओढाताण यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. परंतु एक ते दीड वर्षापासून पैसे भरून देखील मागेल त्याला सौर ऊर्जा योजनेचा लाभ मिळत नाही.

त्यामुळे रक्कम भरणाऱ्या सर्व शेतकरी ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी ग्राहकांनी या योजनेसाठी आजपर्यंत पैशाचा भरणा करणाऱ्या सर्व शेतकरी ग्राहकांना सौर ऊर्जा तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी संबंधिताकडे केली आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com

जयंतीच्या नावाखाली थातूरमातूर काम केल्याने संताप. बीडमध्ये रस्ते विकासाचा बोजवारा; सत्ताधारी आणि प्रशासनाच्या वादात नागरिकांचा जीव टांगणीला! खडीमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे व नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.;

Read More »
WhatsApp Icon Telegram Icon