जिल्ह्याच्या ठिकाणच्या मोठ्या सरकारी दवाखान्यापेक्षा धाराशिव जिल्ह्यातलं पारगावच साधा शासकीय दवाखाना बरा आहे असं म्हणण्याची वेळ आमच्यावर आज आली… बीडच्या जिल्हा रुग्णालयात साधं कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचार द्यावयाचं औषध नसावं ही किती दुर्दैवी बाब आहे. जिल्हा रुग्णालय आहे ते यावर आज विश्वासाच बसला नाही..
माझ्या गावशेजारील गावातील एका गरीब शेतकऱ्याची मुलगी जिल्हा परिषदेच्या आज शाळेत जात असताना तिला पिसाळलेल्या कुत्र्यांने हाताला चावा घेतला.. कुटुंबाने सुरुवातीला नाळवंडीच्या शासकीय आरोग्य केंद्रात नेले.. तिथून त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात जायचं सांगितलं.. तिथं किमान 2 तास वॅक्सिन आहे का नाही हेच सांगायला त्यांनी वेळ लावला..
दरम्यान मी तिथं मानकुरवाडीच्या रुग्णाला भेट द्यायला गेलो असता मुलीच्या वडिलांनी मला पाहिले आणि घडलेली घटना सांगितली.. त्यावेळी संबंधित स्टाफ कडे याबाबत चर्चा केल्यानंतर वॅक्सिन सध्या उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आले.. बाहेरून घेण्याचा विचार केला तर बाहेरील शेजारच्या खासगी मेडिकल मध्येही उपलब्ध नसल्याचं कळलं..
शासकीय दवाखान्यात पुन्हा बोलायला गेल्यावर उद्या दुपारपर्यंत संबंधित वॅक्सिन मिळेल असं सांगण्यात आले.. हाताच्या बोटांना 2-3 टाके पडेपर्यंत पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या त्या मुलीला 2 दिवस विना उपचार ठेवणे कसे शक्य आहे? रेबीजचा धोका असताना संबंधित रुग्णालय स्टाफ याचे गांभीर्य कसे काय ठेवत नाही? असे प्रश्न उपस्थित होतात..
यावेळी माझ्या परिचित शासकीय डॉक्टरांशी मी संपर्क केल्यानंतर चौसाळा जवळील धाराशिव जिल्ह्यात असलेल्या पारगाव येथील सध्या शासकीय आरोग्य केंद्रात संबंधित लस असल्याचं कळलं.. रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले आणि त्यांनी त्या मुलीला तिकडे नेले ..

त्यांच्यासह सोबत आलेल्या दुसऱ्या गावातील कुत्राचाच चावा घेतलेल्या रुग्णाला देखील तिकडं जायचं सांगितले आणि त्यांना ती वॅक्सिन तिथं देण्यात आली.. एवढं सांगायचं कारण एकच आहे की जर बीडच्या जिल्हा रुग्णालयात कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचार घ्यायची वॅक्सिन/ इंजेक्शन मिळत नसेल तर या दवाखान्याच्या कारभारावर सामान्य लोकांनी विश्वास कसा ठेवायचा?
इथले जे कुणी जिल्हा शल्य चिकित्सक आहेत ते इथं काय करत आहेत? त्या मुलीच्या जीवितास काही झाले असते तर यांनी कुणी जबाबदारी घेतली असती का? असे अनेक प्रश्न आहेत… एवढं लिहिल्याने प्रश्न सुटणारे नाहीत मात्र योग्य उपचार मिळण्यासाठी यापुढे हे वाचणारा प्रत्येक जण वेगळ्या मार्गाने प्रयत्न करेल, शासकीय व्यवस्थेच्या बोंबाबोंब सर्वसामान्यांना माहितही झाल्या पाहिजेतच की…
शेतकरी पुत्र – धनंजय गुंदेकर







