जिल्ह्यात “छत्रपती शिवाजी महाराज” महसूल अभियानाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा:- अनिल बोर्डे
बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे आवहान.
गेवराई (प्रतिनिधी) महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान राबविण्यात येणार आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी ग्राहक, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागातील प्रलंबित प्रश्नाचे तात्काळ शिबिरातून निराकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मंडळ स्तरावर ७ व १४ मार्च २०२६ नंतर १० व१७ एप्रिल २०२६ नगरपंचायत व नगरपरिषद स्तरावर ८ व१५ मे२०२६ रोजी शिबिरे आयोजीत करण्यात येणार आहेत.
या अभियानांतर्गत भोगवटदार वर्ग २/ जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतर, जिवंत ७/१२ मोहिमे द्वारे नोंदी दुरुस्ती, प्रलंबित फेरफार प्रकरणाचा निपटारा सामाजिक अर्थसहाय्य योजनाचे आदेश वितरण, सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटप पानंद रस्त्याच्या मान्यता प्रक्रिया तसेच डिजिटल( कोड युक्त ) ७/१२ बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
याशिवाय लोकसेवा हक्क कायदे अंतर्गत सेवा वितरण ई-मोजणी ,अॅग्री स्टॅक, पी एम किसान योजना आदी सेवा जनता दरबार मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महसूल कायद्यातील कलम ४२ अन्वये अ कृषीक हस्तांतर प्रक्रियेतील सुधारणा व एक वेळ आधिमूल्याच्या नव्या दराबाबत ग्राहकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व ग्राहकाने या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवहान बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी या पत्राद्वारे केले आहे.







