ग्राहक दिन हा सक्षमीकरणाचा संदेश देणारा दिवस :- अनिल बोर्डे

गेवराई ( प्रतिनिधी) दिनांक 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात प्रसन्न वातावरणात संपन्न झाला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई व श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला. 

सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई अध्यक्ष तथा बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री अनिल बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रा. भानुदास फलके यांनी केले त्यांनी असे सांगितले की, ग्राहक हा लोकशाहीचा आत्मा किंवा प्राणशक्ती आहे. त्यानंतर बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी अध्यक्ष विचारातून असे सांगितले की, ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकांना तथा ग्राहकांना अधिकार मिळाले आहेत त्याचप्रमाणे कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. ग्राहक म्हणून आपली फसवणूक होत असेल तर त्याच्यावर कायदेशीर न्याय मागतो प्रत्येक अन ग्राहकानी मतदार हक्क बजावताना उमेदवाराला प्रश्नाची जाणीव करून दिली पाहिजे ते प्रश्न सोडून घेतले पाहिजे हे जर समजले तरच खऱ्या अर्थाने लोकशाही होय. ग्राहक सर्व घटना आर्थिक घटक आहे .कारण की संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने ग्राहकावर चालते म्हणून प्रत्येक मालाची एम आर पी तसेच त्या वस्तूची एक्सपायरी डेट असावी तसेच जास्तीच्या किमतीने विकल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. कोणतीही वस्तू साठेबाजी करून जास्त किमतीने विक्री केल्यास माल विकल्यास कायद्याने गुन्हा ठरू शकतो. ग्राहकाने सदैव जागृत राहणे आवश्यक आहे. जोपर्यंत ग्राहक जागृत होत नाही. तोपर्यंत फसवणूक होऊ शकते .कासवाला ज्याप्रमाणे वरील कवच कठीण असते त्यामुळे त्याला स्वतःचे संरक्षण मिळते तसेच ग्राहक जागरूक असल्यास त्याची कोणीही फसवणूक करणार नाही. तसेच ग्राहक हा राजा आहे परंतु ग्राहक संघटित नसल्यामुळे त्याची वारंवार फसवणूक होते. त्यासाठी त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ग्राहकाने सद्यस्थितीत संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच ग्राहक कार्यात सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे .ही काळाची गरज आहे. त्यामुळे त्यांची फसवणुक होणार नाही. या कार्यक्रमासाठी प्रा. भानुदास फलके विश्वास चपळगावकर, वल्लभ तौर, वायचळ सर, मोहन राजंहस, पांचाळ आधी जणांनी कार्यक्रम यशस्वी करण्या साठी उपस्थित राहिले.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com

उमेश आसाराम गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी श.प.‌ यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढत वारकऱ्यांना पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून दिली.

Read More »
WhatsApp Icon Telegram Icon