ग्राहक पंचायत व श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संजय रतन कापसे याचा सहृदय सत्कार = अनिल बोर्डे 

(गेवराई प्रतिनिधी) ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई आणि श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई नगर परिषद येथे श्री संजय रतन कापसे यांची पाणी पुरवठा विभागात निवड करण्यात आली आहे त्यामुळे त्याचा सहृदय सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम सामूहिक रीतीने स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अथवा श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई अध्यक्ष तसचे जेष्ठ नागरिक वीरगुळा केंद्राचे मार्गदर्शक श्री अनिल बोर्डे यांनी श्री संजय रतन कापसे यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली.

त्यांनी असे म्हटले की कापसे सर गोरगरीब जनता आणि सर्व सामन्य नागरिक यांच्या साठी तात्काळ कामे करत असतात सर्वांना पारदर्शक न्याय देतात. तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई चे तालुका अध्यक्ष प्रा. फलके भानुदास यांनी असे म्हटले की.

श्री संजय रतन कापसे याची गेवराई नगर परिषद येथे पाणी पुरवठा विभागात निवड झाली हे त्यांच्या उत्कृष्ट कामाची पावती होय तसेच व्यक्तीचा सन्मान किंवा पद हे त्यांच्या सेवे बद्दल मिळते. सर्व नागरिक यांच्या अडचणी समजून त्याच्यावर उत्कृष्ट मार्ग काढत असतात. खूप मधुर भाषा यातून संवाद. त्यानंतर ग्राहक पंचायत महाराष्ट्र बीड उपजिल्हा अध्यक्ष तथा श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई अध्यक्ष श्री अनिल बोर्डे यांनी सत्कार केला या सत्कार सोहळा साठी श्री बनसोडे. महेश वांदे भय्यासाहेब सौदरमल रामेश्वर घोडके.

रविंद्र सर अरुण लक्ष्मण श्री वायचळ सर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री संजय रतन कापसे यांनी आपल्या विचारतू असे सांगितले की हा सत्कार म्हणजे माझा सत्कार नसून हा सर्व पाणी पुरवठा विभागात जे कर्मचारी काम करत आहेत त्या सर्वाचा सत्कार आहे. मी काम चांगले केले तर पाणी पुरवठा विभागात जे कर्मचारी आहेत ते सुद्धा उत्कृष्ट काम करत असतात. त्यांनी असे म्हटले की ज्या ज्या ठिकाणी अडचण आल्यास निसकोच फोन करा. शेवटी त्यांनी सर्वांचे गोड तोंड चहा त्यांनी स्वतः सर्वांना दिला.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon