जिल्ह्यातील अवकाळी पावसाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी :- अनिल बोर्डे

गेवराई (प्रतिनिधी) जिल्ह्यात परवा अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी ग्राहकाचे पिकाचे व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकाच्या नैसर्गिक आपत्तीचे नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र वतीने करण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील बीड ,वडवणी, केज, आष्टी या जिल्ह्यात व इतर तालुक्यात नुकसान नैसर्गिक आपत्ती मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याबाबतचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. 

विशेष सध्या उभ्या असलेल्या पिकाचे गहू ,हरभरा ,ज्वारी ,कांदा आधी पिकाचे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर फळबागा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

शेतात काढून ठेवलेल्या पिकाचे देखील अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी ग्राहकांच्या पिकाचे व मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात दरवर्षी वारंवार नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतकरी ग्राहकांना बसत आहे त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन व वर्षभराचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शासनाने याबाबत तात्काळ पाहणी करून पंचनामे करून शेतकरी ग्राहकांना युद्ध पातळीवर शासनाने कारवाई करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी या पत्राद्वारे बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी केले आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon