गेवराई: (विशेष प्रतिनिधी)
“वय कमी पण कर्तृत्व मोठे” या उक्तीचा प्रत्यय देणारे आणि आपल्या लेखणीच्या जोरावर अल्पावधीत गेवराईच्या पत्रकारिता क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे श्री. शुभम घोडके. उद्या, ११ मे रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या आजवरच्या प्रेरणादायी प्रवासाचा घेतलेला हा विशेष आढावा…
पत्रकारितेतील एक तपस्वी प्रवास
२०११ सासापासून पत्रकारितेच्या मैदानात उतरलेल्या शुभम यांचा प्रवास ‘दैनिक साप्ताहिक बीड राज्यकर्ता’ पासून सुरू झाला. आज ते ‘दैनिक महाराष्ट्र आरंभ’चे गेवराई तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. केवळ बातम्या देणे एवढ्यापुरती त्यांची पत्रकारिता मर्यादित नसून, विषयाची सखोल मांडणी आणि बातमीतील अचूकता ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. याच गुणामुळे त्यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक आणि अनुभवी पत्रकारांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
निष्ठावान नेतृत्व आणि सामाजिक भान
शुभम घोडके यांची ओळख केवळ एक पत्रकार म्हणून नाही, तर एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनही सर्वश्रुत आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दलची त्यांची निष्ठा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यात त्यांनी केलेले कार्य वाखणण्याजोगे आहे. दांडगा जनसंपर्क आणि राजकीय ओळख असूनही, त्यांच्या स्वभावात कुठेही अहंकार जाणवत नाही.
बँकिंग अनुभवातून शिस्तबद्ध कार्यशैली
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे शुभम यांच्या कामात कमालीचा वक्तशीरपणा आणि स्पष्टवक्तेपणा दिसून येतो. प्रशासकीय कामाची जाण असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. ज्येष्ठ नागरिकांविषयीचा आदर आणि गोरगरिबांना मदतीचा हात देण्याची त्यांची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक उजळून टाकते.
यशाचा पाया: पारदर्शकता अन् स्नेह
एक आदर्श तरुण कसा असावा, याचे शुभम हे उत्तम उदाहरण आहेत. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन अनेकांसाठी दिशादर्शक ठरते. कामातील पारदर्शकता आणि सर्वांशी असलेला जिव्हाळ्याचा स्नेह हाच त्यांच्या यशाचा खरा आधारस्तंभ आहे.
- अशा या अष्टपैलू, अभ्यासू आणि लोकसंग्रह जपणाऱ्या ध्येयवादी युवा पत्रकाराला वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लेखन / शुभेच्छा:
श्री. अनिल गोविंदराव बोर्डे
(जिल्हा उपाध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र तथा अध्यक्ष, श्री जगदंबा सेवाभावी संस्था, गेवराई)







