बीड ग्राहक पंचायत महाराष्ट्र कार्याचे माजी मंत्री मा. श्री बदामराव पंडित यांच्याकडून कौतुक

गेवराई ( प्रतिनिधी )

बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या ग्राहक मार्गदर्शन केंद्र यांच्या कडून ग्राहकाला विविध विषयावर मार्गदर्शन केले जाते. ग्राहकाच्या समस्या बाबत संबंधित कार्यालयास निवेदन दिले जाते ,चर्चा करणे, समस्या बाबत पाठपुरावा करणे, कामाची पूर्तता करून घेणे , ग्राहक हिताची कामे केली जातात. ग्राहक हिताची प्रश्न मांडले जातात.

उपजिल्हा कार्यालयातील एक्स-रे मशीन अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दररोज नियमितपणे चालू राहत नसल्याचे गंभीर बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे रुग्णाला बीड येथे रेफर केले जाते. एक्स-रे ही मूलभूत सुविधा आहे. सदरील सुविधा पुरविण्यासाठी कर्मचाऱ्यांची मागणी करावी अशी मागणी बीड ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्याकडून करण्यात आली होती. ती बातमी वाचून माजी मंत्री मा. श्री बदामरावजी पंडित यांनी भ्रमणध्वनी द्वारे उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक यांना सर्व मशीन अद्यावत करण्याच्या सूचना करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानंतर पुन्हा बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांच्या समक्ष पुन्हा संबंधितांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केलेला आहे व आपले कार्य कौतुकास्पद असल्याचे मान्य केले.
तसेच श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था विरंगुळा केंद्र गेवराई येथील कार्यालयास भेट देणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक कार्यालयात विविध उपक्रम घेतले जातात. विविध संघटनेच्या उत्कृष्ट कार्या बद्दल पदाधिकाऱ्यांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वाढदिवस साजरा करणे, नवीन अधिकाऱ्याचा सत्कार आदी कामे जातात. या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

तसेच गेवराई येथील मान्यवर मा. श्री ह भ प दिलीप घोगे महाराज व भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह डॉ. श्री हेमंत वैद्य, प्रतिनिधी दिव्य मराठी प्रा. सुनील मुंडे व झुंजार नेता प्रतिनिधी श्री राजेंद्र बर कसे, प्रतिनिधी लोक प्रभा, काझी अमान आदीनी कार्याचे कौतुक केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र गेवराई अध्यक्ष प्रा.भानुदास फलके ,ऍडव्होकेट बी एम मुळे ,राजेंद्र सुतार ,प्रमोद कदम आधी प्रयत्न करीत असतात.

Beed Live 24  के बारे में
For Feedback - softisky@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon