सौर ऊर्जा कृषी पंप योजनेत बीड जिल्हा प्रथम ग्राहक पंचायत मागणीला यश:- अनिल बोर्डे

गेवराई( प्रतिनिधी ) ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी सौर ऊर्जा मिळण्यासाठी माहे एप्रिल 2024 पासून वारंवार मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री महासंचालक पुणे ,मुख्य अभियंता लातूर, जिल्हा ऊर्जा व्यवस्थापक बीड यांच्याकडे बीड जिल्ह्यात शेती शिवाय इतर कसल्याही प्रकारचे शेतकरी ग्राहकाला उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे सौर ऊर्जाचा शेतकरी ग्राहकांना लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे .

याबाबत वारंवार पत्र व्यवहार यांना प्रत्यक्ष भेटी वारंवार मागणी केल्यामुळे जिल्हा सौर ऊर्जा योजनेत लातूर विभागात बीड जिल्हा प्रथम आलेला आहे .हे यश ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी वारंवार पाठपुराव्यामुळे केल्यामुळे शक्य झाले आहे .

अशी माहिती बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे याप्रकरणी सर्व जिल्ह्यातील संपादक मंडळी, विविध पत्रकार प्रतिनिधी यांनी सौर ऊर्जा बाबत शेतकरी ग्राहकाच्या हितासाठी वारंवार बातम्या प्रसिद्ध करून मोलाचे सहकार्य केलेले आहे. या प्रकरणी यशात त्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com

उमेश आसाराम गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी श.प.‌ यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढत वारकऱ्यांना पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून दिली.

Read More »
WhatsApp Icon Telegram Icon