शुक्ल यजुर्वेदीय मध्यवर्ती मा.म. ब्राह्मण मंडळाच्या वतीने गेवराई येथील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप.

गेवराई ( प्रतिनिधी )सन मार्च 2025 मध्ये झालेल्या 10 वी 12 च्या परीक्षेत गेवराई तालुक्यातील उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बीड येथे गुणवत्तेनुसार 2 व 3 हजार रुपये शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्ल यजुर्वेदी मा. म. ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे व शुक्ल यजुर्वेदीय शिक्षणोत्तेजक संस्था बीड यांच्या विद्यामाने बीड येथे पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभात गेवराई तालुक्यातील 10 व 12वी विद्यार्थ्यांना 2000 व 3000 रुपये देऊन बीड येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शुक्ल यजुर्वेदीय शिक्षणोत्तेजक संस्था, बीड अध्यक्ष अॅड कालिदास पांडुरंग थिगळे प्रा. विवेक वैद्य सचिव प्रभाकर सेल मोकर प्रा. शशिकांत पसारकर, दिलीप खिस्ती, नंदकुमार झरीकर ,सुधीर देशमुख कडा गेवराई येथील अनिल बोर्डे, यशवंत बंडू सुलाखे, मिलिंद मुळे आधी उपस्थित होते. गेवराई तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये गेवराई तालुक्यातील खालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

चिन्मय कालिदास चोपडे, कु.मैत्री राजेंद्र मुळे, मुग्धा मिलिंद मुळे, ऋतुजा प्रभाकर मुळे, तुळजा संदीप देशपांडे ,कल्पेश कल्याण मुळे ,निखिल अनिल पेठे, श्रीराम शिवाजी जोशी ,गौरी आनंत दिवान धोत्रे ,कृष्णा गणेश सुरडीकर. शुक्ल यजुर्वेदीय शिक्षण उत्तेजक संस्था बीड यांनी दहावी व बारावी विद्यार्थ्यांनी दरवर्षी लाभ घेण्याचे आवाहन संयोजका वतीने करण्यात आले. याप्रसंगी पालक व गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon