बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी: पोलीस अधीक्षकांचा सज्जड दम, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट तुरुंगाची वारी..

बीड | प्रतिनिधी

उद्या, २१ डिसेंबर २०२५ रोजी बीड नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

बीड जिल्ह्यात निकालानंतर कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, जल्लोष किंवा विजयी फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच थेट तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते, असा सज्जड दमही देण्यात आला आहे.

दरम्यान, निकालाच्या दिवशी शहरासह जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असून, संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Beed Live 24  के बारे में
For Feedback - softisky@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon