बीड जिल्ह्यातील ग्राहकाची जुनी वाहने तात्काळ ऑनलाइन करणे बाबत:- अनिल बोर्डे

गेवराई( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील जुनी वाहने ऑनलाइन नसल्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामना करावा लागत असल्यामुळे ऑनलाइन करण्यासाठी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी याबाबत मा. जिल्हाधिकारी बीड व मा. जिल्हा परिवहन अधिकारी बीड यांच्याकडे तात्काळ ऑनलाईन वाहने करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.. बीड जिल्ह्यातील जुनी वाहने ऑनलाईन नसल्यामुळे विक्री केल्यानंतर (नवीन खरेदी दाराच्या नांवे) करून हस्तांतरित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जुनी वाहने विक्री केल्यानंतर ऑनलाइन नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील वाहनधारकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

वाहन विक्री केल्यानंतर देखील जुन्याचं मालकाच्या नांवावर रहात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जुनी वाहने युद्ध पातळीवर ऑनलाइन करून हस्तांतरित होणे आवश्यक आहे. याप्रकरणी तात्काळ युद्धपातळीवर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तरी यावर युद्ध पातळीवर कार्यवाही करून वाहने ऑनलाइन करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. 

     तसेच बीड जिल्ह्यातील वाहने ऑनलाईन नसल्यामुळे (HSRP) नंबर प्लेट करता येत नाही. इतर जिल्ह्यात वाहन गेल्यावर कार्यवाही होण्याची शक्यता असते. 

  त्यामुळे वाहन इतर जिल्ह्यात वाहन गेल्यास ग्राहकांना मानसीक आर्थिक त्रास होण्याची शक्यता असते. 

    त्यासाठी जिल्ह्यातील सर्व वाहने युद्धपातळीवर ऑनलाइन करून ग्राहक वर्गांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी निवेदनाद्वारे संबंधिताकडे केलेली आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com

उमेश आसाराम गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी श.प.‌ यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढत वारकऱ्यांना पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून दिली.

Read More »
WhatsApp Icon Telegram Icon