बीड जिल्ह्याला बारामती प्रमाणे विकास करणारे कुशल नेतृत्व पडद्याआड :- अनिल बोर्डे

बीड प्रतिनिधी:-  जिल्ह्याला बारामती प्रमाणे कुशल नेतृत्व, धाडसी, विकासाचे नेतृत्व, सचोटी, धैर्यशील, आश्वासन पाळणारे नेतृत्व, सर्व विभागाचे ज्ञान असणारे, महाराष्ट्रातील शहरी ग्रामीण भागाच्या समस्या बाबत विकास करणारे नेतृत्व दूरदृष्टी स्पष्टवक्तेपणा, सर्व समाजासाठी प्रयत्न करणारे, सर्व समाजाला न्याय देणारे, महाराष्ट्राच्या सर्व प्रश्नांचा अभ्यास असणारे नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा यांच्या विमान अपघाताच्या दुर्दैवी मृत्यूमुळे महाराष्ट्राची व बीड जिल्ह्याची महाभयंकर व अपरिमित हानी झालेली आहे. ती कदापिही भरून येणे शक्य नाही. बीड जिल्हा पुन्हा एकदा काळोख्यात गेला आहे. यापूर्वी मराठवाडा व बीड जिल्ह्याचा विकास करणारे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे अचानक अपघातात गेल्यामुळे कुटुंबाचे व महाराष्ट्राचे व जिल्ह्याचे यापूर्वी ही महाभयंकर नुकसान झाले आहे. विकासाचे नेतृत्व अचानक गेल्यामुळे विकासाची संधी वारंवार जात आहे ही बाब जिल्ह्यासाठी वारंवार दुर्दैवी ठरत आहे. तरी यापुढे मा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी बीड जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करून जिल्ह्याचा विकास करून वरील नेत्यांना बीड जिल्ह्याच्या तळमळीची , अंतिम इच्छा पूर्ण करावी ही खरी श्रद्धांजली ठरेल . 

 

तसेच अजित दादाच्या कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे ते कदाचित भरून येणारे नाही. त्यांना यामधून सावरण्याचे बळ कुटुंबांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही पुन्हा ईश्वरचरणी प्रार्थना! 

   अनिल बोर्डे  – ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष तथा अध्यक्ष श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई. विविध संस्थेचे पदाधिकारी.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon