बीड प्रतिनिधी:- फिर्यादीची फिर्याद थोडक्यात अशी की, फिर्यादी नामें विष्णू भरत कुलगुडे राहणार करचुंडी ता. जि. बीड येथील रहिवासी असून आरोपी हा स्वराज्य नगर ता. जि. बीड. येथील रहिवासी आहे आरोपीचे मुळ गाव करचुंडी आहे फिर्यादी व आरोपी हे एकाच गावचे रहिवाशी असून उभयतांमध्ये १० ते १५ वर्षापासून मित्रत्त्वाचे, विश्वासाचे संबंध आहेत. आरोपी हा गंगाभारती महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म.करचोंडी, ता.जि.बीड याचे चेअरमन/अध्यक्ष होता आरोपीच्या पतसंस्थेत आरोपीने मुदत ठेव करण्याकरीता फिर्यादीस विनंती केली. फिर्यादीने आरोपीसोबतचे मागील मित्रत्त्वाचे विश्वासाचे संबंध पाहता, फिर्यादीने आरोपीच्या पतसंस्थेमध्ये रक्कमरू.२,००,०००/- (दोन लक्ष रूपये) ची ठि,१३-०५-२०२२ रोजी मुठत ठेव केली.
त्याचा पावती ४२१५ असा होता. त्यानंतर आरोपीने जुलै २०२३ मध्ये रक्कम रू.१,००,०००/- (एक लक्ष रूपये) व्यवसायिक व घरगुती अडचणी करीता फिर्यादीकडे हातउसने मागितली व फिर्यादीने आरोपी याचे सोबतचे विश्वासाचे व मित्रत्त्वाचे संबंध पाहता, फिर्यादीने आरोपीस रक्कम रू.१,००,०००/- (एक लक्ष रूपये) दि.२० जुलै २०२३ रोजी रोख दिले. सदर हातउसने रक्कम रू.१,००,०००/- (एक लक्ष रूपये) आरोपीने फिर्यादिस ६ महिन्यात परत करण्याचे आश्वासन दिले. फिर्यादीने जानेवारी २०२४ मध्ये आरोपीस हातउसने दिलेल्या रक्कम रू.१,००,०००/- (एक लक्ष रूपये) ची मागणी केली असता, आरोपीने त्याचे खाते असलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप.बँक लि.बीड, शाखा -बार्शी रोड, बीड, येथील खाते क्र.०२६००२३००००२७२३ चा धनादेश क्र.०२३४३९ दिनांक रक्कम रू.१,००,०००/- (एक लक्ष रूपये) चा धनादेश फिर्यादीचे हक्कात दिला व सदर धनादेश नमूद तारखेला वटला जाईल व फिर्यादीस रक्कम मिळून जाईल, असे आश्वासन आरोपीने फिर्यादीस दिले.असे की, फिर्यादीने आरोपीवर विश्वास ठेवून सदरचा धनादेश आरोपीकडून स्वीकारला.
फिर्यादीने सदर धनादेश त्याचे खाते असलेल्या भारतीय स्टेट बॅक, शाखा- शिवाजी नगर, बीड येथील खातेमध्ये दि.२३-०२-२०२४ रोजी वटणेकरीता जमा केला असता, सदर धनादेश आरोपीच्या खात्यात धनादेश वटण्या इतपत रक्कम शिल्लक नाही या कारणास्तव दिनांक २६-०२-२०२४ रोजी परत केला त्यानंतर फिर्यादीने आरोपीशी संपर्क साधला, पण आरोपीनेफिर्यादीस उडवा-उडवीची उत्तरे दिली व सदर धनादेशावरील रक्कम देण्यास साफ नकार दिला. त्यानंतर फिर्यादीची खात्री झाली की, आरोपीने त्याचे खात्यात धनादेश वटण्या इतपत पुरेशी रक्कम शिल्लक नसताना, फिर्यादीस धनादेश देऊन आरोपीने जाणिवपुर्वक फिर्यादीची फसवणूक केली आहे. त्यानंतर फिर्यादीने सदरचे धनादेश न वटता परत आल्यानंतर विधिज्ञा मार्फत फिर्यादीने आरोपीस दि.०८-०३-२०२४ रोजी सदरच्या धनादेशावरील रक्कम मागणी नोटीस वकीलामार्फत रजिस्टर नोटीस पाठवली सदरची नोटीस आरोपीस ०९-०३-२०२४ रोजी मिळाली सदर नोटीस मिळून देखील आरोपीने मुदतीत रक्कम फिर्यादीस परत केली नाही त्यामुळे फिर्यादीने मा. मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब,बीड येथे कलम १३८ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अन्वये तक्रार दाखल केली सदर फिर्याद दाखल केल्यानंतर सदर प्रकरण एस .एस.सी.५७२/२०२४ नोंदवले गेले. सदर प्रकरण फिर्यादीतर्फे फिर्यादी विष्णू कुलगुडे यांची साक्ष नोंदवण्यात आली व अभिलेखावर मूळ धनादेश,धनादेश न वाटता परत आल्याचा मेमो, नोटीस आर पी ए डी पावती, इत्यादी कागदपत्रे दाखल केले सदर प्रकरणात आरोपीतर्फे सदर व्यवहार हा पूर्वीचा असलेबाबत असल्याबाबत बचाव आरोपीने घेतला. युक्तिवादअंती फिर्यादीच्या पुराव्याचे अवलोकन करून माननीय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब बीड.
यांनी सर्व साक्षी पुराव्यांचे अवलोकन अवलोकन व फिर्यादीचे विधिज्ञ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य करून मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब यांनी आरोपीस तीन महिने शिक्षा व धनादेश रक्कम व दंड मिळून अशी एकूण १ ,५०,०००/- एक लाख पन्नासहजार रुपये रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेश केले. सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे ॲड. सागर नाईकवाडे, यांनी काम पाहिले त्यांना ॲड. सुधीर जाधव, ॲड. सतीष गाडे, ॲड. राजेश जाधव, ॲड. विवेक डोके ॲड. कृष्णा आवारे, आकाश गायकवाड यांनी सहकार्य केले.







