जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकरी ग्राहकाचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या :- अनिल बोर्डे

गेवराई ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकरी ग्राहकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात अचानकपणाने पावसाने थैमान मांडल्यामुळे शेतामध्ये आलेला गहू, ज्वारी ,बाजरी आदी पिकाची अक्षरश: माती झालेली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे. शेतकरी ग्राहकाच्या तोंडाशी आलेला घास गेलेला असल्यामुळे शेतकरी हैरान झालेला आहे. दरवर्षी जिल्ह्यात अशा प्रकारे अचानक नुकसान होत आहे. शेतीला वेळोवेळी संकट येत असल्यामुळे पिके भोई सपाट झालेले असून शेतकरी ग्राहकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .तरी याबाबत शेतकरी ग्राहकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी . मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी या पत्राद्वारे केलेली आहे. 

काल अचानकपणे झालेल्या पावसामुळे जोमात आलेली होती परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू ,ज्वारी, बाजरी आधी पिके उध्वस्त होऊन माती झालेली आहे. शेतकरी ग्राहकाच्या स्वप्न भंग झालेले आहे. शेतकरी ग्राहक दरवर्षी आशेने कष्ट करीत असतो परंतु दरवर्षी त्याच्यासमोर वेळोवेळी संकट येत आहे. तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी . शेतकरी ग्राहक केंद्रबिंदू मानून शासनाने पूर्वीप्रमाणे पीक विमा योजना लागू करावी. 

 तरी याप्रकरणी शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकरी ग्राहकांना मदत देण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी या पत्राद्वारे केले आहे.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon