ग्राहक पंचायत महाराष्ट्र मराठवाडा विभाग व जिल्हा कार्यकारणीची बैठक उत्साहात संपन्न

गेवराई ( प्रतिनिधी) बीड येथे विभाग सहसंघटक सौ.शैलजा ताई सेलमोहकर यांच्या निवासस्थानी मराठवाडा विभागाची बैठक उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये विभागातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ. विजयजी लाड, सह संघटक सौ. मेधाताई कुलकर्णी, राज्य 

कार्यकारणी सदस्य श्री हेमंत जी मराठे, विभागाध्यक्ष सतीश जी माने, संघटक प्रा. हेमंत वडणे, सचिव सचिन कवडे, शरद सेलमोहकर आदी उपस्थित होते. 

त्यानंतर बीड जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांच्या समवेत बैठक उत्साहात घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रश्नाबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनेत तरुणाने सहभाग होणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे याबाबत चर्चा करण्यात आली. बीड जिल्ह्यात ग्राहक पंचायत चे कार्य मोठ्या प्रमाणात वाढ करणे राज्य कार्यकारणी करून सूचना करण्यात आल्या त्याबाबत सर्वांनी प्रयत्न करण्याची ठरले. या बैठकीत बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष प्रा. रावसाहेब गजेऀ, उपाध्यक्ष अनिल बोर्डे, सहसंघटक गणेश टकले, अॅड नरेंद्र कुलकर्णी, अॅड अरविंद काळे, विष्णू देशमुख आदी उपस्थित होते.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com

उमेश आसाराम गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी श.प.‌ यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढत वारकऱ्यांना पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून दिली.

Read More »
WhatsApp Icon Telegram Icon