लोकनेत्यांचा ज्येष्ठ नागरिकांकडून हृद्य सत्कार; माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

गेवराई: (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि जनमानसात ‘आबा’ म्हणून ओळखले जाणारे लोकनेते बदामराव पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

येथील राजवर्धन कॉम्प्लेक्समध्ये भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित कार्यालयांच्या शुभारंभ प्रसंगी बदामराव पंडित यांना ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विशेष शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि जनमानसात ‘आबा’ म्हणून ओळखले जाणारे लोकनेते बदामराव पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. येथील राजवर्धन कॉम्प्लेक्समध्ये भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी बदामराव पंडित यांना ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विशेष शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.गेवराई शहरातील राजवर्धन कॉम्प्लेक्समध्ये भाजपाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्री. जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व विरुंगळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.अनिल गोविंदराव बोर्डे यांनी पंडित यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक प्रमोद कदम आणि अनिल बोर्डे यांच्या हस्ते बदामराव पंडित यांचा ‘लोकनेता’ म्हणून हृद्य सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मिळालेल्या या शुभेच्छांनी बदामराव पंडित भारावून गेले होते.

यावेळी बोर्डे यांनी पंडित यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव करत, त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशा भावना व्यक्त केल्या.या सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर, भाजपा पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयाच्या शुभारंभासोबतच आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

beedlive24  के बारे में
For Feedback - ashokpgaikwad2@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon