गेवराई ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात रब्बी हंगामात सुधारित पंतप्रधान पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. वातावरणातील अनियमितता ,कीड रोग आणि इतर नैसर्गिक कारणामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना या योजनेतून संरक्षण मिळणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना 15 डिसेंबर ची मुद्दत देण्यात आली आहे.
तरी जिल्ह्यात शेतकऱ्यांना यंदाच्या सन 2025-26 रब्बी हंगामातील पिक विमा योजनेत गहू बागायत हरभरा रब्बी कांदा या तीन पिकासाठी अधिसूचित पिकासाठी अधिसूचित महसूल मंडळ क्षेत्रात अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून सहभाग घेता येईल. सदर योजनेत सहभाग कर्जदार व बिगर कर्जदारांना ऐच्छिक असुन योजनेत सहभागी होण्याची गहू बागायत हरभरा कांदा रब्बी या योजनेत सहभागी होण्यासाठी 15 डिसेंबर25 पर्यंत देण्यात आली आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्री – ट्रॅक नोंदणी फार्मर आयडी, खाते क्रमांक, सातबारा आठअ आदी कागदपत्रे व ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे आदी समस्या साठी कृषी कार्यालयास संपर्क करावा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी ग्राहकाने रब्बी पिक विमा योजना चा लाभ घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक महाराष्ट्र पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी केले आहे.







