ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण
जागतिक हक्क दिन दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो. ग्राहकांच्या हक्का विषयी जागृती निर्माण करणे त्यांच्या हिताच्या रक्षण करणे हा दिनाचा मुख्य उद्देश आहे.
ग्राहकाला गुणवत्ता पूर्ण सेवा मिळाव्यात फसवणूक होऊ नये आणि त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी हा महत्त्वाचा जागतिक दिन मानला जातो. अमेरिकेचे तात्कालीन राष्ट्राध्यक्ष जाॅन एफ केनेडी यांनी 1962 मध्ये प्रथमच ग्राहक हक्काची संकल्पना मांडली. त्यांनी ग्राहकासाठी चार मजबूत हक्कांचा उल्लेख केला त्यामध्ये सुरक्षितेचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार करण्याचा हक्क, माहितीचा हक्क यांचा समावेश आहे. या संकल्पनेच्या विस्तार करत 1983 पासून ग्राहक दिन जागतिक स्तरावर साजरा केला जाऊ लागला. संयुक्त राष्ट्र संघाने 1985 मध्ये ग्राहक संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली वस्तूता ग्राहक संरक्षण कल्पना प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्राचीन संस्कृतीमध्ये व्यापारी व ग्राहका तील व्यवहारासाठी काही नियम कौशल्याच्या अर्थशास्त्रात व्यापारासाठी काही नियम सांगितले होते .व्यापाऱ्यांनी वस्तूचे योग्य मूल्य ठरवावे व फसवणूक करू नये या यामध्ये नमूद करण्यात आले आहे. रोमन कायद्यामध्ये विक्री अटी करार भेसळयुक्त विरोधातील नियम स्पष्ट होते एखादी वस्तू निकृष्ट असेल चुकीची माहिती देऊन विक्री केली असेल तर ग्राहक संरक्षण मिळत असे युरोपमध्ये व्यापारी व कारागीरासाठी गिल्ड्स व्यवसाय संघटना होत्या या गिल्ड स उत्पन्नाची गुणवत्ता व किंमत नियंत्रित करत. भारतात काही ठिकाणी व्यापाऱ्यासाठी नियम ठरले होते .राजा आणि स्थानिक प्रशासना द्वारे लागू करण्यात येत होते. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले त्यामुळे ग्राहकांची फसवणूक वाढली त्यासाठी ग्राहक हक्कासाठी विविध कायदे व चळवळी निर्माण झाल्या. 19 व्या शतकातील सुरुवात भेसळयुक्त अन्न व बनावट औषधे चुकीची जाहिरात रोखण्यासाठी कायदे केले गेले. 20 व्या शतकात ची अधिक प्रभावी मांडणी झाली. ग्राहकाने सुरक्षित करण्यासाठी विविध कायदे चळवळी आणि आंतरराष्ट्रीय धोरणे अस्तित्वात आली. बदलत्या काळात वाढत्या बाजारपेठेत ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा कंपन्या फसवणूक चुकीची निकृष्ट उत्पादन किंवा अवाजवी किमती यामुळे ग्राहकांची दिशाभूल करतात .या पार्श्वभूमीवर ग्राहक संरक्षण कायदे हक्क यांचे महत्व अधो लिखित होते भारतात ग्राहक संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 लागू केला आहे. या कायद्याअंतर्गत ग्राहकाच्या तरतुदी करण्यात आले आहेत. ग्राहक तक्रार निवारण करण्यासाठी जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावर न्यायालय स्थापन करण्यात आली .ग्राहक व दिशाभूल करण्यात जाहिरातीवर दंड व कारवाई करण्याची तरतूद आहे . खरेदी दरम्यान हा हिताचे संरक्षण व्हावे या ई कॉमर्स कंपनीवर जबाबदारी निश्चित केली आहे.
ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या आथक परिश्रम आणि पाठव पुराव्यामुळे 24 डिसेंबर 1986 रोजी भारतीय संसदेने ग्राहक संरक्षण कायद्यास मंजुरी दिली आणि याद्वारे शोषणमुक्त. नवीन सिद्धांत तयार झाला.
संकलन- अनिल बोर्डे – बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा गेवराई मार्गदर्शन केंद्र प्रमुख.







